शाळेत सोडण्याच्या बहाण्याने मुलीवर लैंगिक अत्याचार

Photo of author

By Sandhya

वारजे माळवाडी पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

शाळेत सोडण्याची बतावणी करुन अल्पवयीन मुलीवर मोटारीत बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीतील आहे. ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर (वय २९, रा. पोळ काॅलनी, आपटे सोसायटी रस्ता, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीचा आहे. त्याची पीडित मुलीच्या आईशी ओळख होती. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास अल्पवयीन मुलीला मोटारीतून शाळेत सोडतो, असे सांगून तिला आरोपीने नेले. कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर त्याने मोटार थांबविली. मोटारीत त्याने मुलीला धमकावून बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली.
त्यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक तरडे तपास करत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page