Today, the ‘Sampark T.V. Device Distribution Program’ for Zilla Parishad Primary Schools was concluded with enthusiasm at Zilla Parishad Hall, New Building, Nashik, jointly organized by Zilla Parishad Education Department and Sampark Foundation.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, डिजिटल आणि दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘संपर्क टी.व्ही. डिव्हाईस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी निगडित दर्जेदार शैक्षणिक सामग्री, ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीने शिकण्याची संधी उपलब्ध होणार असून शिक्षण अधिक रंजक, परिणामकारक आणि समजण्यास सोपे होईल.
यावेळी बोलताना सांगितले की, “संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून आपण निश्चितच उत्कृष्ट कार्य करून दाखवाल, अशी मला खात्री आहे. येणाऱ्या काळात या उपक्रमाचे सकारात्मक आणि समाधानकारक परिणाम दिसून येतील. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आनंददायी बातम्या आपण सर्वांना पाहायला मिळतील.”
या कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील डिजिटल शिक्षणाला नवी गती मिळणार असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भरीव वाढ होण्यास मदत होणार आहे. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.