आठवडा उलटला तरी बॅरिकेड कायमच; रस्त्याच्या मधोमध उभे पोल वाहतुकीस धोका

Photo of author

By Sandhya

गणेशोत्सव संपून आठवड्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी पेठेतील रस्त्यांवर उभे केलेले अनावश्यक पोल आणि बॅरिकेड अजूनही काढण्यात आलेले नाहीत. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याच्या मधोमध उभे पोल अपघातांना आमंत्रण देत आहेत. छोटा-मोठा अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची राहणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वाहतूक पोलिसांनी व संबंधित प्रशासनाने तातडीने या बॅरिकेड्स व पोल हटवावेत, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page