
भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न
आळंदी : आळंदी हे भाविकांचे आध्यात्मिक केंद्र आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. या जनसंपर्क कार्यालयामुळे कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्यासाठी तसेच नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळेल,” असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याला गती देण्यासाठी आळंदी शहरात भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मंडल अध्यक्ष वैजयंता उमरगेकर, संजय घुंडरे, सागर बोरुंदिया, रामदास भोसले, अशोक उमरगेकर, सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, दिनेश घुले, सचिन काळे, किरण येळवंडे, मंगल हुंडारे, संगिता फपाळ, आकाश जोशी, ज्ञानेश्वर बनसोडे, संकेत वाघमारे, बंडुनाना काळे, अभिषेक उमरगेकर, अनिल वाघमारे त्यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“आळंदी शहराच्या प्रगतीसाठी भाजपने केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण करणे, या उद्देशाने कार्यालय सुरू केले आहे. आगामी निवडणुकीत पक्षशक्ती वाढविण्यास हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.