उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरील चौकात सतत अपघात, उपाययोजना करा नागरिकांची मागणी

Photo of author

By Sandhya

अपघाताचे कारण — दुभाजकावरील गतीरोधक?

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सतत अपघात होत असुन शुक्रवारी (७ नोव्हेंबर) रोजी पहाटे इनामदार वस्ती येथे दुचाकीचा अपघात झाला असुन यात याच दरम्यान, मध्यरात्री इनामदार वस्ती परिसरात दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात सुरेश कुमार दस (वय २३, रा. बिहार) हे जखमी झाले असून अविनाश यादव (वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींना कस्तुरी रुग्णवाहिका चालक संतोष झोंबाडे व माऊली लाड यांनी तातडीने उपचारासाठी रवाना केले. तसेच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस
उपनिरीक्षक रमेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरील चौकात १६ टायर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात रस्त्यालगत असलेला स्ट्रीट लाईटचा खांब तुटून रस्त्यावर कोसळला. सुदैवाने महामार्गावर वाहन नसल्याने दुसरा अपघात टळला.
याआधी दोन दिवसांपूर्वीच उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनी आणि कस्तुरी चौकात वेगवेगळे दोन अपघात झाले होते. त्यात एका महिलेला गंभीर दुखापत झाली होती. सतत घडत असलेल्या अपघातांमुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरच्या दुभाजकाजवळ सोलापूर दिशेला असलेल्या गतीरोधकावरून जाताना एका टेम्पो चालकाने अचानक ब्रेक मारला. पाठीमागून येत असलेल्या (एमएच १२ यू एम १०३३) ट्रकचा चालक टेम्पोचा अंदाज न आल्याने त्याने वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट दुभाजकावर चढवला. यात दुभाजकावरील स्ट्रीटलाईटचा खांब तुटून रस्त्यावर पडला.

अपघातामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे. संबंधित ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असल्याने स्थानिक नागरिकांनी दिशा दर्शक फलक, स्ट्रीटलाईट व गतीरोधकांची पुनर्रचना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page