
जिल्ह्यात एकूण चार टप्प्यांमध्ये १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. श्री खंडेरायाच्या नगरीत देव संस्थानचे वतीने स्पर्धकांचे स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती देवसंस्थांचे अध्यक्ष श्री मंगेश घोणे ,विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, विश्वस्त पोपट खोमणे यांनी दिली.
या स्पर्धेमुळे सायकलिंगला एक महत्त्वाचा खेळ म्हणून नवी ओळख मिळणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने जेजुरीतील खंडोबा मंदिर सुद्धा मुख्य पटलावर येण्यास मदत होणार आहे . या निमित्ताने ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेची प्रमुख ट्रॉफीचे बुधवार दिनांक 14 रोजी सायंकाळी श्री खंडेराया चरणी पूजन करून स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न व्हावी अशी प्रार्थना विश्वस्त मंडळ ,पुजारी वर्ग ,ग्रामस्त व भाविकांच्या वतीने श्री खंडेरायाना करण्यात आले.