
नांदुरा : नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील शेतकरी देविदास आत्माराम खोंदले वय ३८ वर्ष या युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जापायी स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे.
नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील अडोतीस वर्षीय देविदास खोंदले याचे महाल पिंप्री शिवारात शेत असून या शेतावर त्यांनी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे साडेचार लाख व वडिलांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबाचे कर्ज काढले होते.सततची नापिकी व गेल्या एक दोन वर्षांपासून ऐन पीक घरात येण्याच्या अवस्थेत अतिवृष्टीसदृश्य पावसाचा कहर होत असल्याने उत्पन्नाच्या आशेवर वेळोवेळी पाणी फिरत असल्याने आर्थिक विवचनेतून कर्ज भरावे तरी कसे?अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.त्याचे पश्चात वैभव १३ वर्ष,वैष्णवी ८ वर्ष, देवांश दीड वर्ष असे मुलेमुली,पत्नी,आईवडील व एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे.