केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जेजुरी गडावर खंडोबा देवाचे घेतले दर्शन.

Photo of author

By Sandhya

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेवूनच प्रकल्प मार्गी लागेल.

केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेवून भंडाराची उधळण केली.
शनिवार दिनांक 2 रोजी बारामती येथील दौरा उरकून दुपारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जेजुरी गडावर जावून कुलदैवत पूजा करून दर्शन घेतले.तसेच कुलधर्म कुलाचार नुसार तळी भंडाराचां धार्मिक विधी केला.
यावेळी पुरंदर विमान तळाबाबत पत्रकारांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी पुरंदरचां विमानतळ आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत आग्रही आहेत,या विमानतळासाठी राज्य सरकार भूसंपादन करतील.
भूसंपादन करताना भूमी पुत्रांवर अन्याय होणार नाही.शेतकऱ्यांना विश्वासात घेवून त्यांना सोबत घेऊनच हा प्रकल्प पुढे नेहण्यात येणार आहे.
पुरंदर विमानतळ बाबत स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप,अशोक टेकवडे, विद्यमान आमदार हे शेतकऱ्यां बरोबर समन्वय साधत असून कोणावर ही अन्याय होणार नाही असे मोहोळ यांनी सांगितले.
यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप,अशोक टेकवडे,भाजपाचे नेते जालिंदर कामठे,जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे ,महिला अध्यक्षा स्नेहल दगडे,जान्हवी बोरसे,रंजन तावरे,जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष सचिन पेशवे,गणेश भोसले,अलका शिंदे,मंगल पवार, सचिन सोनवणे,सुधीर गोडसे,गणेश आगलावे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा श्री मार्तंड देवसंस्थान चे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अड पांडुरंग थोरवे, डॉ राजेंद्र खेडेकर, विश्वास पानसे यांनी जेजुरी गडावर सन्मान केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page