

महाराष्ट्राचा अभिमानाचा क्षण — पुण्यातील लाल महालात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने सजलेले महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (World Heritage Sites) समाविष्ट करण्यात आले आहेत. हा निर्णय महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.
या घोषणेनंतर पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल परिसरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात परिसर दणाणून गेला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरणात ऊर्जा संचारली. मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
हा निर्णय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जागतिक स्तरावर मिळालेली मान्यता असून, महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा गौरव जागतिक पातळीवर अधोरेखित झाला आहे.