


रुद्रतेज प्रतिष्ठान हडपसर यांच्या वतीने जेजुरीच्या खंडेरायाच्या दारात सर्वाधिक मानाचे असलेले संबळ हे वाद्य ढोल ताशा पथकामध्ये पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आले.
श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्या हस्ते जेजुरी गडावर संबळ या वाद्याचे पूजन करण्यात आले .त्यासोबतच खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये शंखनाद करून वातावरण भक्तीमय चैतन्यमय करण्यात आले त्यानंतर श्री मार्तंड देव संस्थांच्या गडकोट परिसरामध्ये रुद्रतेज प्रतिष्ठानच्या तब्बल 51 वादकानी खंडेरायाच्या चरणी सेवा अर्पण केली ढोल ताशा झांज आणि पहिल्यांदा समाविष्ट झालेले संबळ या पारंपारिक वाद्यांच्या ध्वनीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झाले. परिणामी सर्व भाविकांना गणेशोत्सवाची चाहूल लागत होती.
यावेळी डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी सांगितले की संबळ हे वाद्य अतिशय पवित्र व पारंपारिक आहे ढोल ताशा पथकांमध्ये संबळचे वादन होणे हे केवळ संस्कृतीवर्धनाचेच काम नव्हे तर धर्माचे ही काम आहे. रुद्र तेज प्रतिष्ठानने केलेल्या या नवीन उपक्रमाचे श्री मार्तंड देव संस्थांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन केले .इतर ढोलताशा पथकांनीही त्यांचे अनुकरण करून हिंदू उत्सवांमध्ये पारंपारिक वाद्यांना अमुलाग्र असे स्थान द्यावे असे आवाहन केले.
यावेळी रूद्रतेजचे संस्थापक अध्यक्ष अमित विलास गायकवाड, अध्यक्ष पंकज रंभोर
उपाध्यक्ष सुनील माळी,ज्ञानेश्वर माऊली कुदळे,यश राऊत
पार्थ वाघमारे ,कपिल गायकवाड,मंगेश मेमाणे,आशिष मगर,पोपट फडतरे,ओंकार मांगडे
कल्पेश बारवकर,मयुर चांदगुडे उपस्थित होते.