तांदुळवाडीत तरुणावर हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

Photo of author

By Sandhya

Two arrested for assaulting youth in Tandulwadi

बारामती पोलिसांकडून दोन मुख्य आरोपी अटकेत; इंस्टाग्राम ला रील ठेवल्याचे वादातून मारहाण,परस्पर विरोधी गुन्हे दाखल

बारामती-तांदुळवाडी (ता. बारामती) येथे एका कार्यक्रमादरम्यान जेवण वाढत असताना काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे वादावरून १८ वर्षीय तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तातडीची कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.दि. १८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता सार्थक लक्ष्मण अंबुरे (वय १८, रा. तांदुळवाडी) हा भैरवनाथ मंदिरात पालखीतील भाविकांसाठी जेवण वाढण्याचे काम करत होता.यावेळी गावातील एकाने त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो डिलीट करण्यावरून वाद झाला.नंतर पप्पू शितोळे याने त्याला काम असल्याचे सांगून मंदिराच्या मागील बाजूस नेले.तेथे आधीच गणेश सुभाष जाधव, अभिजीत शेळके,अरुण जाधव व अन्य इसम उपस्थित होते.
यानंतर सार्थकला शिवीगाळ करून जबरदस्तीने यश शितोळे यांच्या घराकडे नेण्यात आले.तेथे खाली पाडून गज आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.यावेळी गणेश जाधव याने गचुंडे धरून पिस्तूल काढत जीवे मारण्याची धमकी दिली, तर पप्पू शितोळे याने प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
मारहाणीत सार्थकच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे.जीवाच्या भीतीने त्याने तत्काळ तक्रार दिली नव्हती.मात्र, दुसऱ्या दिवशी दुखापतीचा त्रास वाढल्यानंतर त्याने आईसह बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. गंभीर दुखापत केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत तालुका पोलिसांनी तात्काळ पोलीस पथक पाठवून मुख्य आरोपी गणेश सुभाष जाधव (वय ३४) व पप्पू शितोळे (वय ३४, दोघेही रा. तांदुळवाडी) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
दरम्यान एक अल्पवयीन मुलास सुद्धा डोक्यात कोयता लागला होता, त्याचे तक्रारीवरून आरोपी सार्थक अंभोरे आकाश आंबोरे बापू अंभोरे पोपट अंभोरे लखन अंभोरे सर्व राहणार तांदुळवाडी यांच्या विरुद्ध गंभीर दुखापत केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सेहगील अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस अमलदार सुरेंद्र वाघ भारत खारतोडे जितेंद्र शिंदे मनोज पवार दादा दराडे आफ्रिन शेख यांनी केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page