‘दगडूशेठ’ गणपती च्या दर्शनाला नूतन वर्षारंभी अलोट गर्दी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे पुष्प सजावट

Photo of author

By Sandhya

पुणे : मंगलमूर्ती मोरया… गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात नूतन वर्षाचे स्वागत करीत श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासून गर्दी केली. पहाटे ३ वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने नूतन वर्षारंभानिमित्त मंदिराला आकर्षक पुष्परचना करण्यात आली. सकाळपासून अभिषेक शृंगार, सुप्रभात आरती, नैवेद्यम आरती, दुपारी माध्यान्ह आरती, सायंकाळी महामंगल आरती आणि रात्री शेजाआरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

नूतन वर्षारंभी जशी सजावट करण्यात आली होती, त्याचप्रमाणे गुरुवार निमित्त मंदिरात दैनंदिन अभिषेक, शिशु पूजन सेवा, वैयक्तिक गणेश याग देखील झाले. भाविकांनी यामध्ये देखील मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता. अनेकांनी रस्त्यावरुनच श्रीं चे दर्शन घेत नवे वर्ष सुख समृद्धीचे जावो, अशी प्रार्थना केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page