दिवेघाटात प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगा, प्रवाशांचे हाल

Photo of author

By Sandhya

दिवेघाट परिसरात मंगळवारी दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पुणे–सासवड मार्गावरील दिवेघाटात अवजड वाहनांची संख्या वाढल्याने आणि घाटातील अरुंद रस्त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी वाहनचालकांना तासन्‌तास अडकून पडावे लागले.

सकाळी कार्यालयीन वेळेत तसेच दुपारी परिस्थिती अधिक गंभीर झाली. काही ठिकाणी अवजड वाहन बिघाड झाल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या कोंडीचा फटका शालेय विद्यार्थी, नोकरदार, ग्रामीण भागातून शहरात येणारे प्रवासी तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना बसला.

वाहतूक कोंडीमुळे घाटातील अपघाताचा धोका वाढल्याचे चित्र होते. माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, प्रशासनाकडून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि घाटातून जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page