



भारतीय सैन्याचे कॉलम पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य करत आहेत
पुणे, १९ ऑगस्ट २०२५ : नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात भारतीय सैन्याचे कॉलम, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि स्थानिक प्रशासन यांच्या घनिष्ठ समन्वयातून मदतकार्य सुरू आहे.
ताज्या माहितीनुसार, हसनाळ गावातील जवळपास ८० टक्के भाग अद्यापही पाण्याखाली आहे. पाच जण हरविल्याची नोंद झाली होती, त्यापैकी चार मृतदेह सापडले असून एक जण अद्यापही बेपत्ता आहे.
भारतीय सैन्याचे जवान कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. तसेच तातडीच्या मानवतावादी मदतीसाठी वैद्यकीय शिबिर आणि अन्न वितरण केंद्रे उभारण्यात आली असून, पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत पुरवली जात आहे.