नारायणगाव येथे 50 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाला जाणीवपूर्वक लावली आग

Photo of author

By Sandhya

नारायणगाव येथे आज रात्री अचानक दोन वाजता कलासागर गार्डन मंगल कार्यालय शेजारी ,हॉटेल महालक्ष्मी सेंटरच्या बाजूला असणाऱ्या ट्रॅक्टर शो रूमजवळील असणारे 50 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाला जाणीवपूर्वक कोणी तरी आग लावली. या लागलेल्या आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी मारून सुद्धा आग विझत नव्हती.तरी कठीण परिस्थितीत पाण्याची मोटर चालू करून मोठ्या पाईपने आपदा मित्र सुशांत भुजबळ,भरत मुठे, स्थानिक नागरिक वसंत भुजबळ,अक्षय भुजबळ यांनी आग विजवण्यास मदत केली.सदर घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ,पोलिस हवालदार मंगेश लोखंडे , पोलीस कर्मचारी दत्ता ढेंबरे , सुदीप आढाव व सोनवणे साहेब यांनी भेट देऊन आग विझवण्यासाठी सहकार्य केले ,याआधीही बुधवार दि. 9 एप्रिल रोजी पुणे -नाशिक महामार्गावरील तात्यासाहेब भुजबळ कृषी महाविद्यालय कॉलेज समोर भुजबळ बंधू सुपर श्रीराज हॉटेल समोर असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाची फांदी अचानक रस्त्याच्या मध्यभागी पडली होती.
या घटनांनंतर वृक्षप्रेमी नागरिकांनी रस्त्यावर अचानक पडणारी वडाची फांदी तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page