
पुणे, दि. १२ नोव्हेंबर : आधुनिक नातेसंबंधांच्या गोड–तिखट जगात घेऊन जाणारा ‘पाणीपुरी’ हा चित्रपट आता केवळ टाटा प्ले मराठी सिनेमा या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या काळात हा सिनेमा प्रदर्शित होणार असून तो प्रेम, गैरसमज आणि पुन्हा एकदा एकमेकांकडे वळण्याच्या प्रवासाची मनाला भिडणारी कहाणी सांगतो. चार जोडपी आणि एक तडफदार वकील यांच्या गोंधळातून उलगडणारे विनोद, भावनांचे रंग आणि नात्यांचे वेगवेगळे पैलू यांचा हा प्रवास प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडतो.
या चित्रपटात मकरंद देशपांडे आणि भारत गणेशपुरे यांसारखे ताकदीचे कलाकार प्रमुख भूमिकेत असून त्यांच्या अभिनयामुळे कथा जिवंत झाली आहे. नाती जुळण्यापेक्षा तुटणे सहज झालेले आजच्या काळात, प्रेमाच्या मुळ अर्थाकडे पुन्हा पाहायला लावणारा हा चित्रपट प्रत्येक पिढीला भावेल असा आहे. नावाप्रमाणेच ‘पाणीपुरी’ ही सर्व चवींची सांगड घालणारी सफर आहे—कधी खारट, कधी गोड, कधी आंबट–तिखट, पण नेहमीच मनाला भिडणारी.
१४ नोव्हेंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत टाटा प्ले मराठी सिनेमा (सेवा क्र. १२०२) वर या चटपटीत प्रेमकथेला चुकवू नका. ‘पाणीपुरी’ – एक हसरी, विचारांना प्रवृत्त करणारी आणि मनाला हळवी करणारी सफर, जी नात्यांचा अर्थ नव्याने समजावते.