

पुणे -पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात आज सकाळी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर १५ ते २० जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या या विद्यार्थ्यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून संबंधित गुन्हेगारांविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर विद्यार्थी दररोज सकाळी तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेला शारीरिक सराव करत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही अज्ञात व्यक्ती सरावस्थळी येऊन सतत त्रास देत होत्या, धमक्या देत होत्या, अश्लील हावभाव करत होत्या. आज या त्रासाचे रुपांतर थेट मारहाणीमध्ये झाले.