बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Photo of author

By Sandhya

बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता म.ए.ओ हायस्कूल येथे होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी आहेत.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान स्ट्रॉंग रुम व मतमोजणी केंद्र परिसरात सुरक्षा व वाहतुक व्यवस्था सक्षम ठेवण्यासोबतच नागरिकांची संभाव्य गर्दी विचारात घेता २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ५ ते रात्री ८ वाजे दरम्यान पुढील प्रमाणे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

बारामती शहरातील भिगवणकडे जाणारे वाहतूक तीन हत्ती चौक- माळावरची देवी-कोर्ट कॉर्नर मार्गे रिंग रोडने भिगवणकडे वळविण्यात येणार आहे. तसेच भिगवण चौक एडवायझर चौक-टी.सी कॉलेज सातव चौक मार्गे सम्यक चौक भिगवणरोडकडे वळविण्यात येणार आहे.

भिगवणरोड कडून बारामतीकडे येणारी वाहतूक कोर्ट कॉर्नर- माळावरची देवी- मोतीबाग चौक- मार्केट यार्ड बारामती अशी वळविण्यात येणार आहे. तसेच सम्यक चौक सातव चौक भिगवण चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
तिरंगा चौक रेल्वे स्टेशन गेट सर्व्हिस रोड चालू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page