बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याचे नारायणगाव पोलिसांचे आवाहन

Photo of author

By Sandhya

नारायणगाव –नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गालगत, नारायणगाव बायपास येथील सदगुरू हॉटेलसमोर असलेल्या स्वच्छतागृहाजवळ एक अंदाजे ४० वर्षे वयाचा अनोळखी बेवास पुरुष दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी आढळून आला होता. या इसमास तात्पुरत्या निवाऱ्याकरिता शिवऋण युवा प्रतिष्ठान, शिरोली बु., ता. जुन्नर, जि. पुणे येथे ठेवण्यात आले होते.

दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वी मयत घोषित केले.

सदर मयत हे पुढील तपासाकरीता नारायणगाव पोलीस स्टेशन अ.म.रनि.नं. ४१/२०२५ बी. एन.एस.एस. १९४ प्रमाणे येथे वर्ग करण्यात आले आहे. सदर मयत इसमाबाबत कोणतीही ओळख पटलेली नसून, याबाबतचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे.

तरी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, सदर छायाचित्रातील व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास, कृपया नारायणगाव पोलीस स्टेशन, फोन नंबर: ०२१३२-२४२०३३ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

Leave a Comment

You cannot copy content of this page