
मुंबई | महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.
या सोडतीनुसार राज्यातील विविध महापालिकांमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गांसह महिलांसाठीही आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
महापालिकानिहाय महापौर आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले आहे :
1) छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण (महिला), 2) नवी मुंबई – सर्वसाधारण, 3) वसई-विरार – सर्वसाधारण, 4) कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती, 5) कोल्हापूर – ओबीसी, 6) नागपूर – सर्वसाधारण, 7) बृहन्मुंबई – सर्वसाधारण, 8) सोलापूर – सर्वसाधारण, 9) अमरावती – सर्वसाधारण (महिला), 10) अकोला – ओबीसी (महिला), 11) नाशिक – सर्वसाधारण, 12) पिंपरी-चिंचवड – सर्वसाधारण, 13) पुणे – सर्वसाधारण, 14) उल्हासनगर – ओबीसी, 15) ठाणे – अनुसूचित जाती, 16) चंद्रपूर – ओबीसी (महिला), 17) परभणी – सर्वसाधारण, 18) लातूर – अनुसूचित जाती (महिला), 19) भिवंडी-निजामपूर – सर्वसाधारण, 20) मालेगाव – सर्वसाधारण, 21) पनवेल – ओबीसी, 22) मीरा-भाईंदर – सर्वसाधारण, 23) नांदेड-वाघाळा – सर्वसाधारण, 24) सांगली-मिरज-कुपवाड – सर्वसाधारण, 25) जळगाव – ओबीसी (महिला), 26) अहिल्यानगर – ओबीसी (महिला), 27) धुळे – सर्वसाधारण (महिला), 28) जालना – अनुसूचित जाती (महिला) आणि 29) इचलकरंजी – ओबीसी.
आरक्षण स्पष्ट झाल्याने प्रत्येक महापालिकेत इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांची हालचाल वाढली असून, येत्या काळात उमेदवारी अर्ज, आघाड्या आणि निवडणूक रणनीती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.