



महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यकुशल उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांनी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात जाऊन भगवान श्री भीमाशंकराची मनोभावे पूजा, अभिषेक करून भक्तिभावाने दर्शन घेतले.या पवित्र स्थळी भगवान श्री भोलेनाथाच्या चरणी लीन होऊन राज्यातील बळीराजावरील संकट दूर होऊ दे,राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे,सर्व समाजघटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना केली. पूजेनंतर भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार केला.मोठ्या संख्येने उपस्थित भक्तगण व स्थानिक नागरिकांशी साहेबांनी संवाद साधला.त्यावेळी उपस्थित शिवसेना सचिव राम रेपाळे, ठा.म.न.पा चे माजी उपमहापौर रमाकांत मढवी,माजी नगरसेवक विकास रेपाळे,मंदार केणी,शिवसेना जिल्हाप्रमुख देवदास दरेकर,महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनशेठ गोरे,युवासेना कार्यकारणी सदस्य सचिन बांगर,शिवसेना खेड तालुका प्रमुख निलेश पवार,युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे,धनंजय बाप्पु पठारे,युवासेना तालुकाप्रमुख विशालआप्पा पोतले,आंबेगाव तालुका प्रमुख प्रविण थोरात, शिवसेना नेते रमेश भाऊ येवले, शिवसेना संघटक नित्यानंद शेठ येवले युवासेना सचिव वैभव ढोकले, युवासेना शिरूर तालुका प्रमुख विष्णु वाळके,कट्टर शिवसैनिक सागर वर्पे, शिरूर लोकसभा सोशल मीडिया प्रमुख सोमनाथ नवले,
श्री क्षेत्र भीमाशंकर खेड,आंबेगाव,शिरूर तालुक्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.