विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका -पंकजा मुंडे

Photo of author

By Sandhya

भाजप समोर केवळ विकासाचा मुद्दा

महिला भगिनींनो “देवाभाऊं”च्या विजयासाठी निवडणूक हाती घ्या- पंकजा मुंडे

पिंपरी चिंचवड 9 जानेवारी (प्रतिनिधी): भाजपची मुख्य भूमिका म्हणजे स्त्रीचा सन्मान आहे. स्त्रीशक्ती शिवाय शिव सुद्धा शून्य आहे. म्हणूनच भाजपने महिला भगिनींचा सन्मान करणारे स्त्री शक्तीयुग आणले. म्हणूनच महिला भगिनींनी आपल्या विकासाची ही निवडणूक हाती घ्यायची आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. विरोधक चुकीचे सांगतील मात्र या भूलथापांना बळी पडायचे नाही. भाजपचा विकासाचा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावर आपण भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यायचे आहे असे आवाहन पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, आर.पी.आय. (आ.) मित्रपक्षातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ विमल गार्डन, रहाटणी येथे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे उपस्थित होत्या. दरम्यान
प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवार नीता पाडाळे, कोमल काळे, अॅड हर्षद नढे आणि विनोद नढे. प्रभाग 23 मधील उमेदवार मनीषा पवार ,तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे, प्रभाग 24 मधील उमेदवार करिष्मा बारणे, सिद्धेश्वर बारणे, शालिनी गुजर, गणेश गुजर. प्रभाग क्रमांक 27 मधील उमेदवार बाबासाहेब त्रिभुवन, अर्चना तापकीर, सविता खुळे, चंद्रकांत नखाते. प्रभाग 28 शत्रुघ्न काटे, अनिता काटे, संदेश काटे, कुंदा भिसे या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही प्रचार सभा पार पडली.

पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, गेल्या 20 ते 25 वर्षापासून सातत्याने पिंपरी चिंचवड शहरात येत असते. या शहराने कायम विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विकासाची भूमिका ठामपणे मांडल्यामुळे गेल्या दहा वर्षात सर्वसामान्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचली आहे. उज्वला योजना, गरीब कल्याण योजना, जनधन योजना यांसारख्या योजनांमधून तळागाळातल्या वंचितांपर्यंत मदतीचा ओघ पोहोचला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना अंमलात आणली नसती तर आज आमच्या लाखो लाडक्या बहिणींचे पैसे थेटपणे त्यांच्या खात्यात जमा झाले नसते. याच माध्यमातून आलेली किसान योजना, बेटी बचाव बेटी पढाव या योजनेमधून आपण वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे प्रत्येक घटकाची सुधारणा हे सूत्र आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक विचाराचे सरकार असल्यानंतर देशांमध्ये अमुलाग्र सुधारणा कशी होऊ शकते हे आपण गेल्या दहा वर्षांमध्ये पाहिले आहे. भाजपच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे एक युग आपण आणले आहे. स्त्रीचा सन्मान करणारी भाजपची भूमिका आहे. स्त्रीशक्ती शिवाय शिव सुद्धा शून्य आहे. त्यामुळे जी पाळण्याची दोरी सांभाळते ती जगाला सुद्धा उद्धारू शकते. ही भूमिका भाजपने सर्वदूर पोहोचवली . महिलाशक्ती मध्ये खूप मोठे दायित्व आहे. म्हणूनच भाजपच्या माध्यमातून आणलेली ”लाडकी बहीण योजना” समाजाच्या सर्व घटकांवर दूरगामी परिणाम करणारी ठरली असेही मुंडे म्हणाल्या.
भाजपने कधीच जातीवादी धर्मवादी भूमिका स्वीकारली नाही असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या गरिबांचे अश्रू पुसताना कोणताही रंग, कपडे याचे प्रमाण मानले नाही. कोणतीही योजना रंग पाहून राबविली नाही. तर प्रत्येक योजनेत माणुसकीची जाण आहे. गरीबीच्या रंगातून बाहेर पडून संपन्नतेचा रंग आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page