साडे पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्नआरोपीला अटक

Photo of author

By Sandhya

कुरकुंभ : दौंड तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुरकुंभ येथे साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील मळद गावच्या परिसरात शुक्रवारी (ता. १६ मे) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नवनाथ चंद्रकांत रिठे (वय २७ वर्ष, शेरेचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१६) दौंड तालुक्यातील कुरकुंभ मधील पुणे- सोलापूर महामार्गावरील भागवत वस्ती येथील एका किराणा दुकानासमोरून पीडित चिमुकलीचे आरोपीने अपहरण
केले. त्यानंतर आरोपीने मुलीला मळद (ता. दौंड जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका हॉटेलच्या जवळ असलेल्या ऊसाच्या शेतात नेवून तिला मारहाण केली तसेच तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार
करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अत्याचाराची घटना घडत असताना चिमुकली मोठमोठ्याने रडत होती तेव्हा रडण्याचा आवाज तेथील स्थानिकांच्या कानी पडला. स्थानिकांनी तातडीने ऊसाच्या शेताकडे धाव घेतली. तेव्हा हा संतापजनक प्रकार समोर आला. त्यानंतर गावकऱ्यांनी नराधम नवनाथ रिठे याला पकडून चांगलाच चोप दिला व त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या नराधमाला स्थानिक नागरिकांनी वेळीच पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास उरुळी कांचन
पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षक मीरा मटाले
करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page