सासवडच्या नगराध्यक्षांचा पदभार स्वीकार; केंद्र व राज्याच्या योजनांतून शहराचा कायापालट करणार!

Photo of author

By Sandhya


​नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांचे आश्वासन; लोकनेते चंदुकाका जगताप यांचा विकासाचा वारसा पुढे नेणार

“सासवडकर नागरिकांनी दिलेली जबाबदारी सार्थ ठरवत, सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या सोबतीने शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल. माजी आमदार संजय जगताप यांच्या व्हिजननुसार विकासकामे आणि सुशोभीकरणावर भर देण्यात येईल. विशेषतः भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितार्थ योजना सासवडमध्ये प्रभावीपणे राबवून शहराचा कायापालट करू,” असे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांनी दिले.

​शुक्रवारी (ता. २) आनंदीकाकी जगताप यांनी सासवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष दालनात विधिवत पदभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या सोहळ्याला माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, शहराध्यक्ष आनंद जगताप, सत्ताधारी गटनेते अजित जगताप, नगरपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मनोहर जगताप, लिना सौरभ वढणे, ज्ञानेश्वर जगताप, शितल प्रविण भोंडे, स्मिता सुहास जगताप, सोपान रणपिसे, राजन जगताप, अर्चना चंद्रशेखर जगताप, स्मिता उमेश जगताप, प्रियांका साकेत जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, संजय ग. जगताप, भाजपा पदाधिकारी आणि सासवडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे म्हणाले की, “दिवंगत लोकनेते चंदुकाका जगताप यांचा विकासाचा वारसा मागील पाच वर्षांत यशस्वीपणे राबवला आहे. तत्कालीन आमदार संजय जगताप आणि गटनेत्या म्हणून आनंदीकाकींचे मोठे मार्गदर्शन लाभले होते. आता त्यांच्याकडे थेट नेतृत्वाची धुरा असल्याने शहराच्या विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील.”

​भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी जनतेचे आभार मानत सांगितले की, जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल. असे सांगितले. माजी उपनगराध्यक्ष संजय ग. जगताप यांनी आभार मानले.

Leave a Comment

You cannot copy content of this page