सासवड-कापूरहोळ रस्ता १० डिसेंबरपर्यंत बंद

Photo of author

By Sandhya

Grasslands and Road

​आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेसाठी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू असल्याने सासवड (ता.पुरंदर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारी मुख्य वाहतूक वळवण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सासवड ते चिव्हेवाडी घाट मार्गे कापूरहोळ हा मार्ग दिनांक २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.

​सासवड पोलीस स्टेशनने प्रवाशांना पुढील पर्यायी मार्गांचा वापर करण्याची विनंती केली आहे.
कापूरहोळकडे जाणारे सर्व नागरिक: सासवड – पांगारे – परिंचे – वीर – तोंडल – सारोळा मार्गे पुणे-बेंगलोर महामार्गाचा वापर करावा.​
कापूरहोळकडून सासवडकडे येणारी हलकी चारचाकी वाहने: बेंगलोर हायवेवरून मरीआई घाट – गराडे सासवड मार्गे तसेच चतुर्मुख घाट पठारवाडी – भिवरी सासवड मार्गाचा अवलंब करावा.
कापूरहोळकडून सासवडकडे येणारी जड वाहने: बेंगलोर हायवेवरून सारोळा – तोंडल-वीर – परिंचे-सासवड मार्गे यावे किंवा कापूरहोळ – कात्रज घाट मार्गे पुणे या मार्गाचा वापर करावा.
​नागरिकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले आहे.
२ ते ४ डिसेंबर दरम्यान नारायणपूर येथील श्री दत्त जयंती उत्सवासाठी फक्त चारचाकी हलकी वाहने यांना कापूरहोळ – खेड शिवापूर आणि कापूरहोळ – वेळू मार्गे सासवडला जाण्यास परवानगी असेल.

Leave a Comment

You cannot copy content of this page