सेवा हमी पंधरवड्यात साठे आठ हजाराहून अधिक पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Photo of author

By Sandhya

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यामध्ये आज अखेर एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जुन्नर तालुक्यात २ हजार ९८६, पुरंदर २४०, वेल्हा ३७९, भोर ३२१, बारामती ३०८, इंदापूर १५६, आंबेगाव १ हजार ९९६ , शिरुर १ हजार ७७, खेड १५९, मावळ २७३, मुळशी २८२, हवेली १६५, पिंपरी-चिंचवड ५, लोणी काळभोर १८५ आणि दौंड २३८ तालुक्यात असे एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पाच हजाराहून अधिक रस्त्यांचे सांकेतांक निश्चित

जुन्नर तालुक्यात ३ हजार ५५६, पुरंदर ८, वेल्हा ५, भोर ९७, बारामती ११, इंदापूर १५६, आंबेगाव ४५ , शिरुर ९३६, खेड ७३, मावळ ४, मुळशी ४, हवेली ४, पिंपरी-चिंचवड ५, लोणी काळभोर ८ आणि दौंड १५९ तालुक्यात असे एकूण ५ हजार ७१ शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

रस्ता लोकअदालतीत शेत रस्त्यांबाबत ८९ प्रकरणे निकाली

जुन्नर तालुक्यात ४, पुरंदर ८, वेल्हा ७, भोर ६, बारामती ११, आंबेगाव २९ , शिरुर ८०, खेड ११, मावळ १२, मुळशी १२, हवेली १५, आणि दौंड ९ असे एकूण २०४ रस्ता लोकअदालतीचे आयोजन करुन शेत रस्त्यांबाबत एकूण ८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.

शेतीवर जाण्याकरिता रस्ता उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांकडून एकूण २६५ संमतीपत्र घेण्यासह एकूण ४१४ शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page