सोनाली बेंद्रेने ‘‘इत्ती सी खुशी’ विषयी म्हटले, “खूप मोठ्या कालावधीनंतर इतकी प्रामाणिक गोष्ट आली आहे टीव्हीच्या पडद्यावर”

Photo of author

By Sandhya

आपल्या स्वभावातील गोडवा आणि आपल्या दैनंदिन भावनांशी संबंधित कथानकांची आवड असणाऱ्या सोनाली बेंद्रेला सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेने भुरळ घातली आहे. या मालिकेचे कथानक साधे पण हृदयस्पर्शी आहे. सोनाली बेंद्रेला आवडते तसे आपल्या जीवनाशी संबद्ध कथानक सादर करणारी ही मालिका आहे.

इन्स्टाग्रामवर सोनालीने लिहिले आहे की, एरवी ती काही पुस्तके वाचण्याची शिफारस करत असते. पण यावेळी, तिने सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका बघण्याची प्रेक्षकांना शिफारस केली आहे. तिच्या मते भारतीय टेलिव्हिजनवरील ही मालिका साधी, प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी आहे. तिने नमूद केले आहे की, कित्येक दिवसांनी तिला टीव्हीवर अशी कहाणी सापडली आहे, जी ‘ताज्या हवेची झुळूक’ वाटावी अशी आहे, जी तिला मनापासून आवडली आहे. सोनाली म्हणते, “या मालिकेत भावना आणि हलके-फुलके क्षण यांचे सुंदर मिश्रण आहे, त्यामुळे मला ती खूप आवडली आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व जण ही मालिका बघाल आणि आपली ‘इत्ती सी खुशी’ त्यात शोधाल.”

सोनालीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सुंबुल म्हणते, “सोनाली मॅम, तुमच्या या सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद ❤️. हा तुमचा जणू आशीर्वादच आहे. मी पहिल्यापासून तुमच्या अभिनयाची चाहती आहे. त्यामुळे हे प्रोत्साहन माझ्यासाठी विशेष आहे ✨🙏. अन्विताचा प्रवास माझ्या अंतःकरणाच्या जवळ आहे आणि मला आनंद वाटतो की आम्हाला अपेक्षा होती, त्याप्रमाणे लोकांनाही तो आवडत आहे 🤍.”

Leave a Comment

You cannot copy content of this page