



पुणे :- ” स्वावलंबी भारत अभियान चा विचार नुसतीच चर्चा किंवा धोरणाचा नाही, तो प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम करण्याची आवश्यकता आहे ” असे भा. म. संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष मा. श्री. हिरण्मय पंड्या यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात प्रतिपादन केले. त्यांनी सांगितले की स्वदेशीचा विचार हा जीवनमूल्य आहे, आजच्या परिस्थितीत भारताला स्वरोजगार संपन्न बनवायचे असेल तर कठोरपणे यांचे पालन व प्रचार व प्रसिद्धी करण्याची गरज आहे. या वर्गाला देशातील १७ राज्यातून तसेच विविध उद्योगातील १८ महासंघाचे प्रतिनिधि उपस्थित होते.
स्वावलंबी भारत अभियान म्हणजे काय, त्यांची ध्येय धोरणे काय या विषयी स्वावलंबी भारत अभियांचे राष्ट्रीय सह समन्वयक श्री. जितेंद्र गुप्ता यांनी सोदाहरण विवेचन केले. संपूर्ण रोजगार युक्त भारत, स्वदेशीचा वापर व प्रसार तसेच आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी यांचा सर्वत्र विचार पसरवून विविध उद्योगात तरुणांना उभे करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. स्वावलंबी भारत अभियान यासाठी कटिबद्ध असून देशभरात विविध ठिकाणी आपण उद्योजक मेळावे घेतो, तसेच तरुणांना प्रशिक्षण देखील देतो असे त्यांनी सांगितले.
या संदर्भात भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी नेमकेपणाने काय केले पाहिजे ? यावर चर्चा झाली. विविध प्रकारे यांचा प्रचार व जागरण समाजात करून तरुणांना यांचे महत्व कशा प्रकारे सांगता येईल यावर देखील या बैठकीत विचार करण्यात आला.
सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री तसेच स्वावलंबी भारत अभियान चे क्षेत्रीय समन्वयक श्री. विनय खटावकर यांनी जागरण व प्रत्यक्ष कसे काम करावे या संबंधी मार्गदर्शन केले व प्रमुख मुद्याचे सविस्तर विविरण केले.
भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सरचिटणीस श्री, रविंद्र हिमते यांनी या कामात मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी छोटे छोटे प्रकल्प कसे राबवावेत यांची माहिती दिली, तसेच देशभर आपल्या कार्यकर्त्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला पाहिजे हे स्पष्ट केले.
भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री. अनिल ढुमणे यांनी आभार प्रदर्शन केले,स्वावलंबी भारत अभियाचे अखिल भारतीय प्रभारी रविंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक करून उद्देश स्पष्ट केला व संपूर्ण वंदेमातरम चे सामूहिक गायन होऊन कार्यक्रम समाप्त झाला. विशेष म्हणजे या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी सामूहिक शपथ घेऊन स्वदेशीचा वापर व विचार सर्वपर्यंत पोहोचवू असा विश्वास दिला. भा. म. संघ पुणे जिल्ह्याने या बैठकीच्या सर्व व्यवस्था संभाळल्या होत्या. श्री. बाळासाहेब भुजबळ, श्री. उमेश विश्वाद, श्री. हरी सोवनी, श्री. उमेश विश्वाद, श्री. अर्जुन चव्हाण यांनी संपूर्ण दिवसभर उपस्थित राहून हा कार्यक्रम यशवी केला. अशी माहीती भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.