अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाई पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ टेम्पोतुन २६४ किलो गांजाची वाहतुक करताना दोन इसम ताब्यात, सुमारे एक कोटी बत्तीस लाखाचा गांजा जप्त

Photo of author

By Sandhya

पिंपरी चिंचवड :-मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे व मा. पोलीस सह आयुक्त, मा. शशिकांत महावरकर यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.

सदर आदेशान्वये मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ शिवाजी पवार, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन प्रभावीपणे पेट्रोलिंग करुन व गुप्त बातमीदार नेमुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेकरीता योग्य त्या सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार दि. १४/०७/२०२५ रोजीचे पहाटे दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण व पथक असे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार जावेद बागसिराज यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा परीसरात सापळा रचुन नानेकरवाडी जवळ टाटा कपंनीचा पिवळसर रंगाचा टेम्पो नंबर एम.एच.१२ यु एम./११५५ मधील इसम राम व्यंकट पितळे वय २५ वर्षे रा समता शाळेजवळ धनगरवस्ती उरळी देवाची पुणे व श्रेयस प्रदीप चव्हाण वय २१ वर्षे रा ढमाळवाडी भेकराईनगर हडपसर पुणे हे त्यांचे ताब्यातील टेम्पो मध्ये एकुण २६४ किलो २२६ ग्रॅम गांजा असा एकुण ०१,३२,११,३००/- रु च्या मुद्देमालासह वाहतुक करताना मिळुन आल्याने सदर दोन्ही इसमांना त्यांचेकडील सदर टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेविरुध्द चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ४९६/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page