



गोडाऊन मध्ये पाणी साठल्याने खते पाण्यात भिजली
भिगवण: अकोले– (ता.इंदापूर) येथे रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अकोले परिसरातील खत विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोले येथील शेती उपयोगी औषधे व खते विक्री असलेल्या शुभम दराडे यांच्या अंकलेश्र्वर ऍग्रो एजन्सी या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये त्यांच्या दुकानात आणि साठवणूक केलेल्या गोडाऊन मध्ये पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अंदाजे २५ ते ३० लाखाचे नुकसान झाले आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारी १०-२६-२६ पोटॅश, अन्य पिकांसाठी लागणारी खते पावसाच्या पाण्यात तरंगत असल्याने मोठे नुकसान झाले आहे.दुकानात ही पाणी शिरल्याने शेतीची कीटकनाशके ,फवारणीसाठी तणनाशके यांचे नुकसान झाले आहे.यामुळे खत पुरवठा करणारी अन्य दुकाने व घरात पाणी शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे या झालेल्या पावसाने दुकानदार चिंतेत आहेत.या विक्रेत्यांची नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.