अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत कर्नलचे अफेअर, दौनदाहॉटेलला घेऊन गेला; सैन्यानं केली कारवाई, मात्र…

Photo of author

By Sandhya

नवी दिल्ली – एका कर्नलला लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध बनवणं महागात पडलं आहे. कर्नलचा प्रताप लष्कर अधिकाऱ्याला कळताच त्याने याबाबत वरिष्ठांना तक्रार केली. या तक्रारीत जेव्हा आरोपी कर्नल दोषी आढळला तेव्हा त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.परंतु या संपूर्ण प्रकारात लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीने वेगळीच कहाणी सांगितली
आहे. नेमकं हा काय प्रकार आहे जाणून घेऊया. ज्या प्रकरणात कर्नलला बरखास्त करण्यात आले, हे प्रकरण मे २०२५ पासून सुरू
होते. कर्नलच्या सहकारी लष्करी अधिकाऱ्याने त्यांच्यावर पत्नीसोबत अनैतिक
संबंध असल्याचा आरोप केला. तक्रारदार पतीने म्हटलं की, एका निनावी माणसाने
पाठवलेल्या पॅकेजमध्ये मला पत्नीचे कॉल डिटेल्स सापडले. त्यानंतर हा प्रकार
उघडकीस आला. याचा तपास केला असता कर्नल दोषी आढळले, तेव्हा सैन्याच्या
कोर्ट मार्शलने कर्नलवर बरखास्तीची कारवाई केली. किती आरोप लागले?

अवैध संबंध प्रकरणाची सुनावणी मुख्यालय युनिफॉर्म्ड फोर्सेसचे ब्रिगेडियर र जगमिंदर सिंग गिल आणि सहा कर्नल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ती ८ व्या 9 माउंटन डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल के. महेश यांनी आयोजित केली. आता या शिक्षेला संयोजकांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. दोषी कर्नलवर विविध कलमातंर्गत २ आरोप लागले. पहिला आरोप सृट्टेंबर २०२१ आणि ऑगस्ट २०२२ मध्ये टेलिफोनच्या माध्यमातून सहकारी अधिकाऱ्याशी पत्नीशी संवाद साधला. परंतु या आरोपात ते दोषी आढळले नाहीत. दुसरा आणि तिसरा आरोप कर्नलवर स॒ट्टेंबर २०२१ आणि एप्रिल २०२२ मध्ये लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत हरिद्वार आणि देहाराटून येथे हॉटेलवर थांबल्याचा लागला. या आरोपात कर्नल दोषी आढळले. पत्नीने केला वेगळाच दावा या प्रकरणात लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीने वेगळाच दावा केला. तिच्या साक्षीनुसार. ती प्राथमिक विद्यालयापासून दोषी कर्नलसोबत एकत्रित शिकायला होती. बालपणापासून हे मित्र होते. माझे वय ४२ असून वयस्क होण्याच्या नाते मला कुणाशी बोलायचे याचा अधिकार आहे. आम्ही कुठल्याही हॉटेलला एकत्र राहिलो नाही असा दावा तिने केला. सोबतच पतीसोबत घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि लैंगिक शोषणाचा आरोप पत्नीने केला. पतीसोबत राहणे मला अशक्य आहे असं पत्नीने म्हटलं.

Leave a Comment

You cannot copy content of this page