
तक्रारवाडी ग्रामपंचायतीत फुलले कमळ
भिगवण : गेले तीन महिने संपूर्ण इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष बनून राहिलेल्या तक्रारवाडी सरपंच निवडीवर अखेर पडदा पडला असून, प्राजक्ता सचिन वाघ यांची नवनिर्वाचित सरपंच पदी वर्णी लागली आहे.
इंदापूर तालुक्याच्या राजकारणात ज्या युवा नेत्याचा करिष्मा बघायला मिळतो अशा प्रवीण माने यांनी तक्रारवाडी ग्रामपंचायत कमळ फुलवले असल्याचे चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर मंगळवारी सोनाई पॅलेस येथे सचिन वाघ यांचा सत्कार करून माने यांनी वाघ दाम्पत्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यात नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजू लागल्याने, तक्रारवाडीत लागलेल्या या निकालामुळे, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही प्रविण माने हाच फॅक्टर चालणार असल्याची जोरदार चर्चा शहरभर सुरू आहे.
याविषयी प्रविण माने यांच्याशी संवाद साधला असता सरपंच पदी प्राजक्ता सचिन वाघ यांची झालेली निवड ही सर्वतोपरी सार्थ असून, गेल्या अनेक काळापासून तक्रारवाडी गावातील जी प्रलंबित विकासकामे आहेत ती पूर्ण ताकदीने सुरू होणार असून, या कामी काही गरज असल्यास शासन दरबारी आपण पाठपुरावा करणार असल्याचे माने यांनी प्रतिपादन केले.
सचिन वाघ यांचा सोनाई पॅलेस येथे आज पार पडलेल्या सत्कार सोहळ्याच्या वेळी विजयकुमार गायकवाड, श्रीकांत काशिद, सूरज वाघ, . सागर जगदाळे, यावेळी उपस्थित होते.