

भिगवण:
सरकार आणि कंपन्यांच्या निष्काळजी पणामुळे उजनीच्या चोहोबाजूच्या नागरिकांना पाणी नव्हे तर मलमूत्र पिण्याची वेळ आली आहे. लोकतंत्रातला हा कसला व कोणाचा विकास म्हणायचा ? हा विकास नसुन विनाश आहे.नागरिकांना मलमूत्र प्यावे लागत असेल तर भारताची सभ्यता व संस्कृती मुळे भारत स्वतःला गुरु समजतो तर तो म्हणण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही असे परखड मत जलपुरुष व मॅगसेस पुरस्कर्ते राजेंद्रसिंह यांनी उजनी भेटी वेळी व्यक्त केले.
राजेंद्रसिंह यांनी उजनी पाणलोट क्षेत्राला भेट दिली. ते म्हणले की,उजनीतील पाणी व परिसर रासायनिक पदार्थामुळे विषारी बनला आहे.ज्या लोकांनी मतदान केले ,राज्य करण्याचा अधिकार दिला त्यांनाच मलमूत्र पाजले जात आहे. भारतातील सर्वात जास्त सुशिक्षित शहर म्हणुन पुणे आहे व पुणे,पिंपरी चिंचवड चे रासायनिक व मलमूत्र उजनीत येते आणि नागरिक त्या पाण्यामुळे आजारी पडत आहेत,रोगी बनत आहेत.कॅन्सर,त्वचा आदी रोग पसरत आहेत.
पुण्यातील नागरिकांना ३ रुपयांत एक हजार लिटर शुद्घ पाणी मिळते असे महानगरपालिकेचे अधिकारी सांगत अहेत व इकडे उजनीच्या चोहोबाजूंना वीस लिटरला वीस रुपये मोजावे लागत आहेत.सरकारची हि भूमिका दुटप्पी आहेच शिवाय ती लोकतंत्रासाठी चांगली नाही.लोकतंत्रात अन्न व पाण्यावर समान हक्क आहे तर मग पुणे व उजनी साठी डबल गेम का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यानंतर भिगवण येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना प्रदूषण करणारे राज्य करीत असल्याचा आरोप केला .उजनी प्रदूषण रोखण्यासाठी आता उजनी काठ,सोलापुर व परिसरातील नागरिकांनी लढाईसाठी एकत्रित आले पाहिजे असे मत व्यक्त केले. ही लढाई भविष्यातील पिढीसाठी व आपल्या जीवनाशी आहे.पाण्यामुळे लोक आजारी पडत अहेत आणि त्यांची कमाई आजारपणासाठी घालवावी लागत आहे.त्यासाठी आता नागरिक, शाळा,कॉलेज, विद्यार्थी, ग्रामस्थांनी लढा दिला पाहिजे व प्रदूषणाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचला पाहिजे असा कानमंत्र दिला.अधिकारी पैशासाठी पाण्याचा कसाही रिपोर्ट देतात असाही गंभीर आरोप त्यांनी केला.
कार्यक्रमास जलबीरादरीचे नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर,तेलंगाणाचे माजी मंत्री व्ही.प्रकाशराव,आंध्रप्रदेशचे सत्यनारायण बोलीशेट्टी, रमाकांत कुलकर्णी, सुनील रहाणे, आकांक्षा पांडे तसेच परिसरातील भजनदास पवार,मारुती वणवे,हनुमंत बंडगर,तेजेस देवकाते, शामराव वाघ,सरपंच गुराप्पा पवार,सचिन बोगावत,,संपत बंडगर,रमेशबाबा धवडे, शिवदास सूर्यवंशी,संतोष सवाणे,सीमा काळंगे,सखाराम खोत आदीजण उपस्थित होते.
चौकट:२० टीएमसीमुळे ११७ टीएमसी पाणी विषारी
राजेंद्रसिंह म्हणाले की,पुणे व पिंपरी चिंचवड ही शहरे वर्षाला २० टीएमसी पाणी वापरतात तर ऊजनीत ११७ टीएमसी साठा आहे.हे २० टीएमसी पाणी ११७ टीएमसी पाण्याला विषारी बनवत असेल तर हा कसला विकास ? हा तर विनाश आहे असे खडेबोल सुनावले.