
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे कब्रस्तान शेजारील चौकात एका विना नंबरच्या कार ने वाहतुक कोंडीत उभ्या असलेल्या तीन दुचाकींना उडवून पसार झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दुचाकीवरील महिला किरकोळ जखमी झाली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान उरुळी कांचन येथील रेल्वे पुलाखालील दोन मोरी दुरुस्ती साठी बंद असल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी एक मोरी चालू ठेवण्यात आली आहे. वर्दळ जास्त असल्याने एका मोरीवर वाहतुकीचा लोड येत आल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होते.
बुधवार (दि.२४ सप्टेंबर) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान भवरापूरकडून येणाऱ्या विना नंबरच्या स्विफ्ट कारने वाहतूक कोंडीच्या ठिकाणी थरार माजवला. कोंडीत उभ्या असलेल्या तीन दुचाकींना कारने मागच्या बाजुने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील खाली पडले. व कार वेगाने प्रयागधाम रस्त्याने पसार झाली. त्यावेळी स्थानिक नागरिक अक्षय वनारसे यांनी दुचाकी वरून कारचा पाठलाग केला परंतु कार सुसाट वेगात असल्याने पसार झाली असल्याचे अक्षय वनारसे यांनी सांगितले.
तसेच या अचानक प्रकारामुळे नवमोरी परिसरात काही काळ गोंधळ उडाला. त्यावेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. मारुती कंपनीची स्विफ्ट कार लाल रंगाची होती. तीला नंबर ही नव्हता, कारमधे असे काय होत कि समोर वार्डन (पोलीस मदतनीस) होता. त्याला पाहिल्यानंतरच कार सुसाट निघाली अशी नागरिकांमधे चर्चा होत आहे. व अशा बेसिस्त कारचालकाचा तपास होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तसेच या अचानक प्रकारामुळे नवमोरी परिसरात काही काळ गोंधळ उडाला. त्यावेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. मारुती कंपनीची स्विफ्ट कार लाल रंगाची होती. तीला नंबर ही नव्हता, कारमधे असे काय होत कि समोर वार्डन (पोलीस मदतनीस) होता. त्याला पाहिल्यानंतरच कार सुसाट निघाली अशी नागरिकांमधे चर्चा होत आहे.