


एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’च्या आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षक हसून-हसून लोटपोट होणार आहेत, जेथे हप्पू आणि मॉर्डन कॉलनीचे रहिवाशी विनोदी गोंधळामध्ये अडकून जातात, एकजण मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरा शायरीमध्ये भारावून जातो.
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’च्या आगामी एपिसोडबाबत गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”हप्पू (योगेश त्रिपाठी) राजेशच्या बाबतीत अस्वस्थ आहे, कारण ती सतत वादविवाद करते की हप्पूला तिच्या मनातील काहीच कळत नाही आणि तिला नेहमी स्पष्टीकरण द्यावे लागते. अशीच तक्रार त्याच्याबाबतीत पोलिस स्टेशनमध्ये देखील असते, जेथे हप्पू चुकून मोस्ट-वॉण्टेड गुन्हेगाराला पळून जाऊ दिल्यानंतर कमिशनर (किशोर भानुशाली) त्याच्यावर भडकतो. नाराज झालेला हप्पू देवाकडे प्रार्थना करतो, लोकांच्या मनातील ऐकू येण्याची शक्ती देण्याची इच्छा व्यक्त करतो आणि अचंबित करणारी बाब म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होते. सुरूवातीला आनंदित होत हप्पूला त्याच्या कुटुंबापासून गुन्हेगारांपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनातील ऐकू येऊ लागते, पण लवकरच त्याला जाणीव होते की लोकांच्या मनातील समजणे त्याच्या कल्पनेपेक्षा अधिक त्रासदायक ठरू शकते. हिऱ्यांची तस्करी करणारा धूर्त गज्जू गजेंद्रला हप्पूमधील शक्तीबाबत समजते तेव्हा गोंधळ निर्माण होतो. तो हप्पूला खोडकर विचारांसह हाताळण्याचे ठरवतो. हप्पू या गोंधळामधून बाहेर पडेल का की त्याची ‘मन की बात’ त्याच्यासाठी मोठा पश्चात्ताप ठरेल?”
मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या आगामी एपिसोडबाबत शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”मॉडर्न कॉलनीमध्ये गूढ कवी शायर शेरखानच्या आगमनाने गोंधळ उडाला आहे, जो आपल्या रोमँटिक कवितांनी महिलांना मोहित करतो! तिवारी (रोहिताश्व गौड) आणि विभुती (आसिफ शेख) यांना भीती वाटते की, त्यांच्या प्रिय भाभी त्याच्या काव्यात्मक जाळ्यात अडकतील. त्यांचे रक्षण करण्याचा दृढनिश्चय करून दोघेही त्यांच्या घरांवर लक्ष ठेवू लागतात. एकमेकांवर मात करण्यााठी विभुती आणि तिवारी भाभींना प्रभावित करण्यासाठी शेरखानप्रमाणे वेषांतर करतात, पण त्यांचा प्लॅन उलगडण्यापूर्वीच खरा शेरखान सर्वांची मने जिंकतो! कथानकाना मोठे वळण मिळते, जेथे सक्सेनाला (सानंद वर्मा) कळते की शेरखान खरेतर त्याचा मित्र, कवी चिरकिन आहे, जो हृदयभंग झाल्यानंतर शायरमध्ये बदलला होता. पण सक्सेना बदनाम शायर शेरखानचा पर्दाफाश करू शकेल का, की हा गोड बोलणारा कवी मॉडर्न कॉलनीतील महिलांना मोहित करत राहील?”