

कर्वेनगर येथील डीपी रोडवरील एका भंगारच्या गोडाऊनला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. गोडाऊनमध्ये जुने फ्रीज, कुलर आणि एसी यांसारखा भंगार साठवलेला होता.
आगीची माहिती मिळताच प्रथम वारजे अग्निशामक केंद्राची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर तातडीने एरंडवणे आणि कोथरूड येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तिन्ही गाड्यांनी समन्वयाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून नुकसानाचे अधिक तपशील समजण्याचे काम सुरू आहे.