





सामाजिक बांधिलकीचे एक अनमोल उदाहरण उभे
संजीव जगताप यांची ममता बाल सदनला ५१ हजार रुपयांची उदार मदत
आज कल्याणी टेक्नो फोर्ज लिमिटेडच्या अधिकारी मंडळींनी ममता बाल सदन संस्थेला भेट दिली आणि अनाथ, असहाय्य मुलींसाठी विशेष फराळाचे आयोजन केले. या भेटीत कल्याणी टेक्नो फोर्ज लि. व अविरत सोशल फाऊंडेशन, पुणे यांचे प्रमुख संजीव जगताप यांनी ५१ हजार रुपयांची उदार मदत करून मुलींमध्ये आनंद आणि उत्साह पसरवला. मुलींनी फराळाचा आस्वाद घेतला आणि त्यांचे हसरे चेहरे पाहून उपस्थित सर्वांचे मन आनंदाने भरले.
यावेळी कल्याणी टेक्नो फोर्जच्या अधिकाऱ्यांनी बेकारी प्रोजेक्टलाही भेट देत बेकरी सक्षम करण्यासाठी मुलभूत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रकल्पाला योग्य दिशा देत, प्रोत्साहन आणि कौतुक केले. तसेच, कल्याणी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
ही भेट केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता, मुलींमध्ये प्रेम, काळजी आणि स्नेहाची भावना जागृत करणारी ठरली. उपस्थितांनी सांगितले की, अशा कृतींमुळे समाजातील संवेदनशीलता वाढते आणि अनाथ मुलींना आत्मविश्वासाने आयुष्य जिंकण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना कल्याणी टेक्नोफोर्ज लि. व अविरत सोशल फाऊंडेशन, पुणे यांचे प्रमुख संजीव जगताप यांनी व्यक्त केली. या प्रसंगी पुष्कर पाठक, आनंद रुद्रे, वीणा मॅडम, तसेच KTFL ची – बिसनेस एक्सेलेन्स टीम, कॉस्टिंग टीमचे प्रतिनिधी, ममता बाल सदन चे अध्यक्ष दीपक दादा गायकवाड, अधिक्षिका स्मिता पानसरे, ज्योती गायकवाड, प्रसन्न गायकवाड, संजय गायकवाड उपस्थित होते. कल्याणी टेक्नो फोर्जच्या या मानवीय उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचे एक अनमोल उदाहरण उभे राहिले आहे. शेवटी ममता बाल सदन चे अध्यक्ष दीपक दादा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.