
हिंगोली:- सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी येथील तरुण गणेश तनपुरे यांचा आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीने वाशिमकडे जात असताना चार चाकी टिप्परने धडक देत
सेनगाव आजेगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरचा हा अपघात आज दिनांक 21 मार्च रोजी रात्री 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सदर मयत व्यक्तीचे नाव गणेश तनपुरे राहणार कापडसिंगी वय वर्ष 25 असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत या दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन सदर घटनेची माहिती मिळताच गोरेगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक झळके यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असुन पोलीस तपास करत आहोत.