
पुणे – कालेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी चोरी उघडकीस आणली आहे. एका टायर दुकानातून एकूण ३,४३,९०५/- रुपये किमतीचे नवीन टायर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई कालेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपींनी चोरलेले टायर पुणे, जळगाव आणि इतर भागात विक्रीसाठी ठेवले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींमध्ये काळभोर, कांबळे, पठाण, भालेराव आणि भारती यांचा समावेश असून, त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे एकूण ८२ टायर व एक चारचाकी वाहन असा एकूण ३.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी संबंधित गुन्ह्यांत ३२७, ३७९, ४१४, ३४ भादंवि नुसार गुन्हे दाखल केले आहेत.