काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sandhya

पुणे – काळेपडळ पोलिसांनी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावून एकूण ₹२,४७,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपी सुनील अरदाऊर (वय १९) व प्रकाश काळे (वय १९) हे दोघे हडपसर येथील रहिवासी असून, त्यांनी चोरीची बुलेट (एमएच १२ WH ३०५२) कर्नाटकात विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी कर्नाटकातून बुलेट (किंमत ₹२,४०,०००) हस्तगत केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या गुन्ह्यात २ इंडेन गॅस सिलिंडर आणि ₹२,५०० रोख जप्त करण्यात आले.

ही कारवाई डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमित शेटे व पथकाने केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page