किरकोळ वादातून हल्ला करणाऱ्या आरोपीस मांजरी पोलिसांनी केली अटक

Photo of author

By Sandhya


हडपसर हडपसर शिंदे वस्ती येथे बॅडमिंटन मैदानाच्या पाठीमागे धारदार शस्त्राने एक गंभीर घटना घडली फिर्यादी हे झेप्टा कंपनी डिलिव्हरी करता जात असताना त्यांच्या ओळखीचे इसम अभिषेक पाच पवार व इतर साथीदाराने त्यांच्या मित्राबाबतीत चौकशी केली परंतु व्यवस्थित माहिती न दिल्याने आरोपींनी फिर्यादी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली त्यानंतर आरोपी अभिषेक पाच पवार यांनी धारदार शस्त्राचा वापर करून फिर्यादीच्या डोक्यावर दोन्ही हातावर व गालावर वार करून गंभीर जखमी केली सदर घटनेची मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले दाखल होण्यात यापूर्वीही सिद्धार्थ सोनकांबळे व इतर दोन विधी संघर्षित मुलांना अटक व ताब्यात घेण्यात आले आहे यातील मुख्य आरोपी अभिषेक पाच पवार फरार होता मांजरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश कवणे ठाणे अंमलदार निखिल पवार प्रशांत दुधाडे यांच्या पथकाने अभिषेक गजानन पाच पवार याला ताब्यात घेतली

Leave a Comment

You cannot copy content of this page