
पुणे, दि. २२ : महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेची १२० वी बैठक कृषि मंत्री तथा कृषि परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषि परिषद कार्यालय, पुणे येथे संपन्न झाली.
यावेळी कृषि परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरु, राज्यपाल नियुक्त सदस्य व कृषि क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलेले कृषि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी कृषी विभागाचा पदभार घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीमध्ये तातडीचे विषय घेण्यात आले. यानंतर आगामी बैठकीमध्ये कृषि परिषदेच्या स्तरावरील आणि चारही कृषि विद्यापीठ स्तरावरील सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.
बैठकीत कृषि परिषदेच्या महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल यांनी प्रास्ताविक केले.
०००००