कोंढवा परिसरात महिलेला फसवून अत्याचार; बनावट डिलिव्हरी बॉयकडून संतापजनक कृत्य

Photo of author

By Sandhya

पुणे – कोंढवा येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये काल रात्री साडेसातच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवत महिलेला फसवले आणि तिच्यावर अत्याचार केला.

सदर आरोपीने महिलेच्या दारात येऊन सांगितले की, “तुमच्या बँकेचा लिफाफा आला आहे, कृपया तो रिसीव करा.” त्यानंतर त्याने पेन नसल्याचे सांगत महिलेला पेन आणण्यास सांगितले. महिला घरात पेन आणायला गेली असता, आरोपीने फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर जबरदस्ती केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. महिलेच्या मोबाईलची तपासणी केली असता एक फोटो आणि एक महत्त्वाचा मेसेज आढळून आला असून त्याच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.

कोंढवा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी 10 पथके तैनात केली असून भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 64 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page