
पुणे – कोंढवा परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रकारांवर तसेच “कोयता गँग” विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज कोंढवा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं.
या वेळी माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत ते अद्यापही पोलिसांच्या ताब्यात का नाहीत? या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोरे यांनी प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर नाराजी व्यक्त करत सांगितले की, गुन्हेगार खुलेआम फिरत असताना पोलिसांचे हात बांधलेले का आहेत? हे लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.