
हडपसरच्या अमनोरा साडे सतरा चौकात कोयता गॅंगची दहशत पसरली आहे. आज 9:30च्या दरम्यान या गॅंगने पाणीपुरीची गाडी, मिठाईचे दुकान, ऑटोरिक्षा आणि कॅब फोडून एक ईरटीका कार फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडला आहे , तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुंडांचे स्पष्ट दृश्य दिसत आहे त्या मुळे समोर गावकरी दहशतीत आले आहेत.
कोयता गॅंगच्या सदस्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष टीम गठित केली असून, त्यांच्या ताब्यातील फुटेज आणि गुप्तहेर माहितीच्या आधारे लवकरच अटक होणार असल्याची अफवा आहे. तथापि, गावकऱ्यांचा आक्रोश आहे – “आमच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?”