


वीस तास उलटूनही आरोपी मोकाटच
वीस वर्षीय तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव मुळ ग्रामपंचायत हद्दीतील एका 20 वर्षीय तरुणीच्या अज्ञाताने डोक्यात दगड घालून निर्घुन खुन केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ता. १४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
खून झालेल्या तरुणीचे नाव पुनम विनोद ठाकूर असून ती कोरेगाव मुळ येथील गगन आकांक्षा सोसायटी येथे कुटुंबासह राहत होती.
पुनम ठाकूर ही उरुळी कांचन येथील औषधालय येथे कामाला होती. मंगळवार (ता.१४ ऑक्टोंबर) रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजता कामावरून सुट्टी होती
नेहमी प्रमाणे पुनम कामावरून सुटल्यानंतर मैञीनी बरोबर बसने घरी जाते . घरापासून बस स्थानक ३००ते ४०० मिटर अंतर लांब आहे. सात वाजुन गेले तरी पुनम घरी पोहचली नसल्याने तीच्या भावाने पुनम जेथे कामाला जाते तेथे जाऊन विचारणा केली कि पुनम घरी आली नाही. ती गायब आहे. फोन ही उचलत नाही. पण तीने फोनवरुन तीच्या मावस भावाला सांगितले कि माझ्या भावाला गगन आकांक्षा चे गेट बस स्थानक येथे लवकर पाठव व त्यानंतर तीचा फोन ती उचलत नसल्याचे भावाने सांगितले.
गगन आकांक्षा गेट बाजूलाच उरुळी कांचन प्रयागधाम रोड लगत तीचा मोबाईल, व पाण्याची बाटली दोन पुरुषांचे बुट, एक सॅंडल तीच्या नातलगाना दिसल्याने परिसरात पुनम चा शोध सुरु केला. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला निर्जन ठिकाणी तीनशे फुट अंतरावर मुरमाच्या दोन ढिकाऱ्याच्या मधे पुनम चा चेहरा रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे घटनास्थळी दाखल झाले. व पूनमला उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी पुनम ला मृत्यू घोषित केले. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत असुन अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
वीस तास उलटूनही अज्ञात आरोपी मोकाट आहे.