खेड तालुक्यातील वाहतूक कोंडी सुटणार ,राज्य शासनाची सकारात्मक भूमिका

Photo of author

By Sandhya

 हिंजवडी आय टी प्रमाणे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि विविध नागरी समस्या दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली. असून चाकण औद्योगिक क्षेत्र लवकरच समस्यामुक्त होईल,या दिशेने आता शासनाने पावले उचलली आहे.

    या बैठकीस या बैठकीत आमदार बाबाजी काळे, आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे, तसेच माजी आमदार बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीसह अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव (रस्ते),सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, मुख्य अभियंता, एमआयडीसी, पुणे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (छकअख), पुणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड, तसेच मुख्याधिकारी, चाकण व तळेगाव नगरपालिका, आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत चाकण औद्योगिक क्षेत्राची सध्याची स्थिती, वाहतुकीची कोंडी, अपुर्या पायाभूत सुविधा आणि त्याचा स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा-खेड) या मार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी १सिंगल पॉईंट अॅथॉरिटी तयार करणे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर-यवत) व क्र. ५४८ डी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर) या मार्गांचे काम सुरू करण्यास गती देणे. चाकण औद्योगिक पट्ट्यात जाणार्या रस्त्यांचे विस्तारीकरण व देखभाल, वाहतूक नियंत्रण यंत्रणा मजबूत करणे, पार्किंग आणि सार्वजनिक वाहतुकीची सुधारणा, औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र १फ्रेट कॉरिडॉर तयार करणे, ग्रामपंचायत, नगरपालिका, मएसआरडीसी, पीडब्ल्यूडी,आरटीओ, पोलीस विभाग यांचा समन्वय साधून दीर्घकालीन मास्टर प्लॅन तयार करणे, या सर्व उपाययोजना टप्प्याटप्प्याने राबवण्यावर भर देण्यात आला आहे.

बैठकीत बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, हिंजवडी आयटी पार्कप्रमाणेच येथेही १ सिंगल पॉईंट अॅथॉरिटी तयार करून ठोस अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुती सरकारने सकारात्मक भूमिकेतून हा विषय हाती घेतला असून, चाकण औद्योगिक क्षेत्र लवकरच समस्यामुक्त होईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment

You cannot copy content of this page