

पुणे -आज सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी गंगाधाम चौकात एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अंदाजे 25 ते 35 वयोगटातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.गेल्या सहा महिन्यांत ही अशा प्रकारची दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी याच भागात ट्रकच्या धडकेत सोलंकी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.स्थानिक नागरिकांनी या परिसरात मोठ्या वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्याची मागणी वारंवार केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जीवघेण्या घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. “अशा अपघातांना आळा कधी बसणार?” असा सवाल नागरिक आता उपस्थित करत आहेत.