गट तट विसरून विकासासाठी काम करण्याचा सासवडच्या नगरसेवकांचा निर्धार

Photo of author

By Sandhya


निवडणुक ही काही काळापुरती असते या पुढील काळात गट तट, पक्ष बाजुला ठेवून सासवडच्या
सर्वांगीण विकासासाठी सगळेच कटिबद्ध राहू असा निर्धार सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवड झालेल्या सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी हा विचार मांडण्यात आला.नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार संजय जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे,

नवनियुक्त नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे व अठरा नवीन नगरसेवक उपस्थित होते. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम सुरू झाला.
सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांना तुळशीचे रोप देऊन शाल घालून पत्रकारांच्या वतीने सन्मानित करण्यात आले
ज्ञानेश्वर गिरमे, स्मिता सुहास जगताप, मंदार गिरमे, मनोहर जगताप, बाळासाहेब भिंताडे, स्मिता उमेश जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी यापुढे कार्यरत राहू असे त्यांनी सांगितले. वैभव सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नवीन नगरसेवक व पत्रकार यांनी पोलिसांशी समन्वय साधावा असे आवाहन केले. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी सासवडच्या अनेक प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी सगळेजण एकत्र काम करू, लवकरच सर्वांची
एक विचारसभा आयोजित करू असे सांगितले. पत्रकार मंडळींनी सासवडसाठी यापुढेही आपले योगदान देत रहावे असे आवाहनही आनंदीकाकी यांनी यावेळी केले
लीना सौरभ वढणे, स्मिता उमेश जगताप, सोपान रणपिसे, माउलीआबा गिरमे, प्रियांका साकेत जगताप,
प्रदीप राऊत, मनोहर जगताप, माधुरी तेजस राऊत
स्मिता सुहास जगताप, वैभव टकले, बाळासाहेब भिंताडे
शिल्पा संदीप जगताप, रत्ना अमोल म्हेत्रे, प्रितम ( पप्पू) म्हेत्रे, हेमलता मिलिंद इनामके, मंदार गिरमे, दिपाली अक्षरराज जगताप, शीतल प्रवीण भोंडे हे सर्व नगरसेवक
कार्यक्रमास उपस्थित होते.
भाजप शहर अध्यक्ष आनंदभय्या जगताप, साकेत जगताप, ॲड सौरभ वढणे, ॲड अशपाक बागवान, मोहन चव्हाण, सुहास जगताप यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. सुधीर गुरव यांनी प्रास्तविक केले तर संभाजी महामुनी यांनी आभार मानले. हेमंत ताकवले यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब कुलकर्णी, गणेश मुळीक, जीवन कड, राजेंद्र बर्गे, तानाजी सातव, संदीप जगताप, जगदीश शिंदे, सुनिल वढणे, शकील बागवान या पत्रकार संघाच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page