
पुणे – आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ननंदेच्या मानसिक छळाला कंटाळून एका ३१ वर्षीय विवाहितेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.मृत महिला मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) आणि तिचा मुलगा विष्णु शशिकांत देशमुख (वय ६) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरीने आत्महत्येपूर्वी लिपस्टिकने लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली. या चिठ्ठीत तिने आपल्या ननंदेच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट केलं आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी मयुरीच्या पतीसह सासू आणि ननंद विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.